विष्णुबागेतील एक दिवस
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी माझ्याकडे त्यांच्या वर्गशिक्षिका, साळवे मॅडम यांच्या सोबत ऑफिसमध्ये आल्या आणि मला सांगू लागल्या की आम्हाला पिकनिकला घेऊन चला. त्या आधीच काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी मला हे सांगितले होते की या वर्षी तरी आपण विद्यार्थिनींना शालेय सहलीस नेऊ. दोन वर्षांपूर्वी विष्णुबाग, बदलापूर येथे गेलो होतो. गेल्या वर्षी मुलींनी पैसे न दिल्यामुळे सहल रद्द झाली होती. मग यावेळी पण आपण तिथेच जाऊ असे सर्व शिक्षक म्हणाले. त्या या मुलींची भर पडली आणि मी तसाच कॉल केला प्रणिता रसाळ हिला. प्रणिता रसाळ म्हणजे सचिन रसाळची पत्नी. सचिन हा माझा विद्यार्थी. तो आता चिंचपोकळी येथे राहत नाही तर बदलापूरला राहतो. त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गेली बरीच वर्षे त्याने बदलापूर मध्ये या व्यवसायात जम बसवला आहे. विष्णुबाग सध्या त्याने चालवायला घेतले आहे. तसे तर सदानंद बाग सुद्धा तोच पाहतो. यापूर्वी मी माझ्या मैत्रिणीसोबत बदलापूरला बरेचदा पिकनीकला त्याकडेच जाऊन आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याने आम्हाला नेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सचिनचे जेवण. कौतुक करावे तेवढे कमीच. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून त...