विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....
वरील फोटोमध्ये जी पोस्ट दिसत आहे त्यावरून लक्षात आलेच असेल नेमके काय पुढे असेल ते...
😀 तरीही आनंदाने सांगावेसे वाटते की या पोस्ट नंतर काही दिवसांतच IBM या कंपनीमध्ये आमच्या शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला विशाल वऱ्हाडी याला नोकरी मिळाली. The whole credit goes to one and only one honourable Adhiraj Sir. असे म्हणायचे कारण खरेच त्यांनी सुचविलेली कल्पना जी प्रत्यक्षात आली केवळ या एका पोस्टने.
विद्यार्थी एकदा शाळेतून एस एस सी पास होऊन बाहेर पडले की शाळेशी त्यांचा किंवा शाळेचा संबंध राहत नाही. शाळा पर्यायाने शिक्षक, संस्था त्यांना विसरते असे होत नाही. शाळा तिच्या गतीने चालूच असते, विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये गर्क असतात. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय घडते किंवा घडले आहे हे जोपर्यंत ते पुन्हा शाळेत येत नाहीत तोवर शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल माहीतच नसते आणि मग काही वर्षांनी 'Reunion' करायला विद्यार्थी एकत्र येतात, शाळेत येतात तेव्हा कुठे शिक्षकांना त्यांचे यश अपयश कळते. विद्यार्थ्यांना शाळेतून career guidance मिळाले तर त्याचा फायदा त्यांच्या भावी आयुष्यासाठी होत असतो. 'Job satisfaction ' हे शब्द फक्त वरवरचे नाहीत तर खरंच खूप मोलाचे आहेत. माननीय संचालक राजन लोकेगावकर सर नेहमी सांगतात की career guidance हे ७/८ वी पासूनच व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर लक्ष्य असले पाहिजे आणि ते शाळाच देऊ शकते. जर एखादा विद्यार्थी शाळा, कॉलेज झाल्यानंतर त्याच्या करीअर साठी सुरुवात करतो आणि फक्त लोकं सांगतात म्हणून तो जेव्हा एखादी stream निवडतो तेव्हा कधी कधी भविष्यात त्याला job satisfaction मिळत नाही. हे होऊ नये म्हणून बॉईज हायस्कूल व कन्याशाळेत गेली कितीतरी वर्षे career guidance काही शिक्षकांकडून होत असते. त्यात अजून एक भर पडली ती माननीय अधिराज सरांच्या एका कल्पनेने. आज समाजात तरुण वर्गात जे दिसत आहे त्यावरून त्यांना जाणवले की बरेचदा शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळत नाही किंवा काही कारणास्तव ती संधी हुकते. जर आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या ओळखीमध्ये किंवा त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरी आहे हे जर कळले आणि ते आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जर सांगितले तर योग्य रीतीने व योग्य तो candidate तो जॉब मिळवू शकतो. आपण फक्त सुचवायचे, विद्यार्थी आपल्या शैक्षणिक योग्यतेवर ती नोकरी मिळवू शकतो. योगायोग असा की काही दिवसांतच माजी विद्यार्थी (१९८७ च्या बॅच) श्री. रुपेश झाड यांनी त्यांच्या कंपनी मध्ये computer science मधून B.Sc. असलेल्या freshers साठी job opportunity आहे असे सांगितले. लगेच
SSM Shivaji Vidyalaya, Kalachowki या फेसबुक पेज वर माजी विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट शेअर केली आणि खरंच एका विद्यार्थ्याने, विशाल वऱ्हाडी (२०१५-१६ बॅच) याने त्या संधीचे सोने केले. त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला हे शक्य करता आले. फक्त शाळेने अर्थात माजी विद्यार्थ्यांनी थोडा हातभार लावला. कधी कधी छोट्याश्या गोष्टी कुणाच्या मदतीला येतात. अधिराज सरांच्या या एका छोट्याश्या कल्पनेने विशालला भरारी घेत येईल.
माझी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना विनंती आहे की जर तुम्हाला असे नोकरी किंवा योग्य संधी आहे हे समजले तर आपल्याच विद्यार्थ्यांना आपल्या या फेसबुक पेज वर पोस्ट करा.
ज्योती राणे
एस एस एम सी एम गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी
टिप्पण्या