शिवाजी विद्यालयच्या कन्याशाळेत.....



एसएसएम एमसीएम गर्ल्स हायस्कूल ही शाळा काळाचौकी, मुंबई या विभागातील शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळ या संस्थेची एक शाखा आहे.शाळेला ५३ वर्षे झाली तरी शाळेला शिवाजी विद्यालय कन्या शाळा याच नावाने ती काळाचौकी विभागात सुप्रसिध्द आहे. शिवाजी विद्यालय ही शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळाची पहिली शाळा. आदरणीय भाऊसाहेब लोकगावकर व सुनंदा ताई लोकेगावकर या दांपत्याने तत्कालीन समाजातील गिरणी कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली.
काही वर्षांनंतर भाऊसाहेबांचे निधन झाल्यानंतर सुनंदा ताई आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय राजन लोकेगावकर यांनी हिमतीने डोलारा सांभाळला. सुनंदाताई यांच्या निधनानंतर राजन लोकेगावकर यांच्या पत्नी शुभदा मॅडम या दोघांनी संस्था नावारूपाला आणली. 
२०१७ पासून त्यांचे सुपुत्र माननीय अधिराज लोकेगावकर यांनी आपल्या आजी आजोबांच्या या वटवृक्षाचे संवर्धन करण्याचे शिवधनुष्य उचलले. त्यांनी काळानुरूप विविध उपक्रम संस्थेत राबविण्याची नांदी केली. या उपक्रमांमध्ये त्यांच्या पत्नी डॉ. गौरवी लोकेगावकर या नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करतात.
तरुण, तडफदार, उमदे व्यक्तिमत्व असलेले संचालक माननीय अधिराज राजन लोकेगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम संस्थेच्या सर्व शाखांमध्ये होत असतात. अशाच उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता केलेला उपक्रम. 
निमित्त असे घडले की अतुल मोरे यांच्याकडून  "आपण एखादा उपक्रम महिला सक्षमीकरणाकरिता करू शकतो का?"  असा  विचार मांडण्यात आला. 
श्री. अतुल मोरे येणाऱ्या पुढच्या बॅचसाठी हा कोर्स म्हणजे पहिली पायरी असेल असे वाटते. एक प्रकारे त्यांनी पायंडा पाडला असे म्हणता येईल.  हा एक लघु उद्योजक. पेशाने इंजिनिअर. स्वतःचा व्याप सांभाळून शाळेसाठी वेळ देणारा. तो आणि मी आर एम भट हायस्कूलचे माजी विद्यार्थी.
आमच्या आर एम भट हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघाने एकत्र येऊन शाळेचे रूप पालटले. त्यानिमित्ताने वरचेवर वेगवेगळ्या बॅचमधील माजी विद्यार्थी एकत्र येत असत. त्या काळातच बऱ्याच जणांशी ओळख झाली. त्यातलीच एक ओळख म्हणजे अतुल. 
अतुलला मी एका शाळेची मुख्याध्यापिका आहे हे माहीत होते. गेल्या वर्षी अचानक एक दिवस अतुलचा मला फोन आला. "आपण तुमच्या शाळेत विद्यार्थिनींच्या आर्थिक सबलीकरणासाठी काही करू शकतो का?" असे मला अतुलने विचारले. त्यावर सखोल विचारणा केल्यानंतर मला असे सांगितले गेले की विद्यार्थिनींना आपण वेबसाईट डेव्हलपमेंट हा कोर्स विनामूल्य शिकवायचा व वेबसाईट बनवण्यासाठी उद्युक्त करायचे आणि वेबसाईट बनवण्यासाठी ऑर्डर्स मिळवून द्यायच्या. ज्यांना यात आवड असेल त्यांनी या ऑर्डर्स घ्यायच्या, अर्थात यामध्ये विद्यार्थिनींना कुठेही जावे लागणार नाही किंवा त्यांचा शाळेशिवाय कुणाशीही संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाईल. म्हणजेच विद्यार्थिनींची सुरक्षितता ही प्राथमिकता हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही कल्पना वास्तवात आण्याची असे सुचवले. या उपक्रमासंबंधी संचालक अधिराज सरांना विचारणा केली असता त्यांनी क्षणाचाही विचार न करता या उपक्रमासाठी होकार दिला आणि परिणामतः गेल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींना वेबसाईट डेव्हलपमेंट शिकवण्यासाठी ती अतुल दादा ("मला तुम्ही अतुलदादा म्हणा" असे अतुलने आमच्या विद्यार्थिनींना सांगितले होते) येऊ लागले. परंतु असे लक्षात आले की आठवीच्या विद्यार्थिनींना त्यामानाने या विषयात गोडी नव्हती किंवा त्यांचे वय लहान असल्यामुळे त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. फक्त एकच विद्यार्थिनीने यात रस दाखविला. 
विचारांती तर असे जाणवले की, "हा उपक्रम तर चांगला आहे आणि तो राबवायला पाहिजे". याचे गांभीर्य माझ्या लक्षात आले होते, म्हणून मी व तोडकरी मॅडमनी असे ठरवले की जूनमध्ये इयत्ता दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांच्यापैकी ज्या विद्यार्थिनींना हा कोर्स शिकायची इच्छा आहे अशाच विद्यार्थिनींचा ग्रुप करायचा, त्यांना शिकवायचे आणि त्याप्रमाणे इच्छुक विद्यार्थिनींचा व्हाट्सअप ग्रुप राऊळ मॅडमनी बनवला. जून मध्ये रिझल्ट लागल्यानंतर या विद्यार्थिनींना एकदा शाळेत बोलवले व अतुल दादाने त्यांना वेबसाईट डेव्हलपमेंट म्हणजे काय व आपण काय नेमके करणार आहोत याची कल्पना दिली. १५ विद्यार्थिनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये होत्या. परंतु प्रत्यक्षात आठ विद्यार्थिनींनी यात जास्त रस दाखवला व प्रत्यक्ष कोर्सला सुरुवात झाली. या आठ विद्यार्थिनी आवडीने शाळेत येऊन हा कोर्स शिकत होत्या. त्यातूनही सहाजणी नियमित येत राहिल्या. एक ऑर्डर अतुलदादाने आणलेली होतीच. जवळजवळ महिनाभर या सहा विद्यार्थिनी शाळेत येत होत्या व अतुलदादा त्यांना शिकवत होते. या सर्वांची बसण्याची सोय अटल प्रयोगशाळेत केली गेली होती. प्रत्येकीला क्रोम बुक दिले होते. ( हे क्रोम बुक आम्हाला युवा फाउंडेशन तर्फे जीएफसी रूम बनवून दिली त्यात दिले गेले होते) त्याचा पुरेपूर वापर योग्य रीतीने या विद्यार्थिनींनी केला. वेब साईट जशी बनली त्यात कोडींग करून सुद्धा काही गोष्टी टाकल्या पाहिजेत हे अतुलच्या लक्षात आले म्हणून त्याच्या त्या क्षेत्रातील मित्राशी त्याने बोलून घेतले आणि ऑनलाइन चर्चा करत तेही या विद्यार्थिनींना शिकवले. 
तयार झालेल्या वेब साईट मध्ये काय हवे, काय काढून टाकावे याची चर्चा ऑनलाइन झाली. त्याचे  प्रेझेंटेशन करण्यात आले व ज्यांनी ऑर्डर दिली होती, त्यांच्याशी ऑनलाइन चर्चा करून विचारांती विद्यार्थिनींनी बनवलेल्या वेबसाईट पैकी योग्य ती वेबसाईट निवडण्यात आली. त्याचा मोबदला त्यांना विभागून देण्यात येईल असे ठरले. 
त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिराज सर, शिवाजी विद्यालयचे तेली सर, तोडकरी मॅडम आणि या सहा विद्यार्थिनींचे पालक या सर्वांच्या समक्ष विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले. 
ऑगस्ट महिना चालू असूनसुद्धा अकरावीचे कॉलेज सुरू झालेले नाही परंतु या विद्यार्थिनींना रिझल्ट लागल्यानंतर २ महिन्यांत त्यांचा रिकामा वेळ सत्कारणी लावता आला. नवीन शिकायला मिळाले. पालक व विद्यार्थिनी त्यांच्या पहिल्यावहिल्या छोटीशी का होईना पण मेहनतीच्या कमाईमुळे खूप खुश झाल्या. 
या उपक्रमासाठी अधिराज सरांनी शालेय वस्तू व संसाधने वापरण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानणे आवश्यक वाटते. तोडकरी मॅडम, राऊळ मॅडम, तेली सर या सर्वांचे  या उपक्रमासाठी माझ्या सोबत राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार. या विद्यार्थिनीच्या पालकांनी माझ्यावर विश्वास दाखविला त्यासाठी त्यांचेही आभार मानणे संयुक्तिक ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतुलने सर्वस्वी जबाबदारी घेऊन, स्वतःच्या व्यग्र व्यापातून वेळ काढून या विद्यार्थिनींना शिकविले त्याबद्दल त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाहीच. 
येणाऱ्या पुढच्या बॅचसाठी हा कोर्स म्हणजे पहिली पायरी असेल असे वाटते. एक प्रकारे त्यांनी पायंडा पाडला असे म्हणता येईल.  भविष्यात या विद्यार्थिनी फक्त वेबसाईट डेव्हलपमेंट नाही तर संगणक क्षेत्रात चांगले करिअर करतील याची आशा वाटते. अगदी त्या क्षेत्रात नाही गेल्या पण नवीन काहीतरी, काळानुरूप शिकल्या याचे मला समाधान आहे. 
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

टिप्पण्या

Pramod Kumthekar म्हणाले…
खूपच सुंदर उपक्रम राबवला आहे राणे मॅडम तुम्ही आणि अतुल दादाने. पहिल्या काही सेशन मध्ये मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आणि माझी वेबसाईट सुद्धा याच मुली बनवणार याचा अभिमान सुद्धा आहे. शाळेच्या अशा अनेक उपक्रमात सहभागी होण्याची संधी म्हणजे समाजाप्रती आपली बांधिलकी जपणे. सर्वांनी असे नवनवीन उपक्रम राबविण्यात पुढाकार घ्यावा ही विनंती
Pranita Purushottam Raul म्हणाले…
या संस्थेत कार्यरत असण्याचा सार्थ अभिमान! आमच्या विद्यार्थिनी अश्याच यशस्वी होवोत.
राणे मॅडम खूप खूप अभिनंदन,👏👍



Pramod Kumthekar म्हणाले…
It's so wonderful and great Initiative
Pramod Kumthekar म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
नेहा तोडकरी म्हणाले…
स्तुत्य उपक्रम. विद्यार्थिनींना आत्मविश्वास मिळाला.
Sandhya Kumthekar म्हणाले…
खूप छान उपक्रम आहे
मीनल अशोक घाटकर म्हणाले…
अतिशय उत्कृष्ट उपक्रम. सदर उपक्रमात सहभागी सर्वांचे प्रथम "अभिनंदन. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता घेता स्वावलंबी होण्याचे पाठबळ मिळेल. शिवाय आपण काहीतरी नवीन करू शकतो याचे आत्मबळही प्राप्त होईल.
Srishti Khamkar म्हणाले…
प्रशंसनीय!!!!!
Rupali Kudtarkar Hode म्हणाले…
It's a GREAT initiative as it's a need of time that students need to have a different knowledge at minimum age so they can explore more and they can also decide whether the field is interesting for them or not. And our school is always there to include new and different initiatives which can help to develop a student's future.
Kavita म्हणाले…
Great initiative. Congratulations Rane Madam !!! wishing you good luck and success in all your future endeavors.
“Education is our passport to the future, for tomorrow belongs to the people who prepare for it today.”

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

SSM दहीहंडी

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....