स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शिवाजी विद्यालयाच्या कन्याशाळेत ....

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारतीय स्वातंत्र्याचा तिरंगा फडकला आणि ७५ वर्षांनंतर त्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य भारतीयांना लाभले. अर्थात सुवर्ण महोत्सव सुद्धा समस्त भारतीय जनतेने साजरा केला होता. केंद्र सरकारच्या आदेशानुसार भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सर्व शासकीय आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. 
एस एस एम एम सी एम गर्ल्स हायस्कूल म्हणजेच शिवाजी विद्यालय कन्याशाळा येथे सुद्धा तो जोमाने साजरा करण्यात आला. खरेतर सर्वच शाळा कॉलेज मध्ये साजरा केला गेला. पण आम्ही ज्या पद्धतीने साजरा केला त्या संबंधी थोडक्यात आढावा : 
१५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन आम जनतेला पंतप्रधानांनी केले होते. ९ ऑगस्ट २०२२ पासूनच हे कार्यक्रम करावयाचे होते. ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून गेल्या वर्षी २०२२ ला या दिवसापासून कार्यक्रमांची रेलचेल अख्ख्या भारतभर सुरू झाली. आम्ही सुद्धा ९ ऑगस्टला आमच्या सगळ्या शाळेला म्हणजे विद्यार्थिनींना शाळेच्या प्रांगणात एकत्र केले व आमच्या कला शिक्षिका (शाळेच्या माजी विद्यार्थिनी) श्रीमती नलावडे मॅडम यांच्या कला आविष्काराने अमृत महोत्सव आम्ही साजरा केला. त्यांनी स्वतः विद्यार्थिनींकडून तिरंगे बनवून घेतले.त्यांची व त्यांच्या कलाकार विद्यार्थिनींचे कौशल्य व्हिडिओमध्ये दिसेलच. पुढील व्हिडिओ पहाच म्हणजे तुम्हाला कल्पना येईलच.

video


या वर्षी पुन्हा जेव्हा या अमृत महोत्सवाची सांगता करायची होती तेव्हा केंद्र सरकारने ' मेरी माटी, मेरा देश ' या एका नवीन उपक्रमाची घोषणा केली, ते अशा प्रकारे होते : 
१. अमृत सरोवर/ जलस्त्रोताशेजारी शिलाफलकम उभारणी
२. पंच प्राण शपथ 
३. वसुधा वंदन
४. वीरोंका नमन
५. ध्वजारोहण व राष्ट्रगान
प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योद्ध्यांच्या समर्पणाचे स्मरण व्हावे, याकरिता विशेष अभियान राबविणे अपेक्षित होते. 
या वर्षी १४ ऑगस्टला नलावडे मॅडमनी त्यांच्या कला आविष्काराने अमृत महोत्सवी सांगता केली त्याचे व्हिडिओ व फोटो पहा:


 माझ्या सर्व सहकारी शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या लाडक्या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक. त्यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो नलावडे मॅडमचा. ज्यांच्या कल्पनेतून साकार होतात आविष्कार. खरंच या सर्वांचे खरंच कौतुक करावे तेवढे कमीच. 
आमचे संचालक माननीय राजन लोकेगावकर सर, शुभदा लोकेगावकर मॅडम या दोघांचे कोणत्याही कार्यक्रमाला भक्कम पाठबळ तसेच मार्गदर्शन  असते. माननीय संचालक अधिराज लोकेगावकर व गौरवी लोकेगावकर यांचेही आम्हाला सतत मार्गदर्शन लाभते. या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!!!

                              ज्योती राणे
          एस एस एम एम सी एम गर्ल्स हायस्कूल 




टिप्पण्या

बालवयात विद्यार्थी जेव्हा अशा सकारात्मक उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन अनुभव घेतात, तेंव्हा हे संस्कार,आयुष्यभर राहतात.
छान उपक्रम 👍👌
Pranita Purushottam Raul म्हणाले…
स्तुत्य उपक्रम...अभिनव उपक्रमाची परंपरा अबाधित राखली. श्रीम. नलावडे मॅडम व विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक.
Dipali Pavankumar Darade म्हणाले…
Beautifully illustrated 🥰 Such a praiseworthy pursuit definitely memorable 💖

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

SSM दहीहंडी

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....