केवळ तुमच्यासाठी....


वरील फोटोमध्ये जे दिसत आहे ती कार्यशाळा शिवाजी विद्यालयामध्ये आज घेण्यात आली. काळाची गरज ओळखून एखादे कौशल्य अंगी आणले, आत्मसात केले तर त्याचे दूरवर चांगले परिणाम दिसतात, भविष्य उज्वल होते. त्यातूनही जर स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला तर .... सोने पे सुहागा..... असेच म्हणता येईल. 
संचालक माननीय अधिराज लोकेगावकर यांनी हीच काळाची गरज ओळखली आणि वेगवेगळ्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. आजचा उपक्रम त्यांपैकी एक. 
Tata आणि Voltas यांनी Strive हा उपक्रम सुरू केला आहे. 'कौशल्य विकास कार्यक्रम ' या  भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत हे कौशल्यप्रशिक्षण काही कंपन्या देतात. त्यात पुढाकार घेणाऱ्या Tata व Voltas या दोन अग्रमान्य कंपन्या.आज या कंपनीतर्फे रेखा मिश्रा मॅडमनी या कोर्सेस बद्दल, Strive या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर वीरेंद्र सरांनी ppt द्वारे विद्यार्थ्यांना कोर्सेस बद्दल संपूर्ण माहिती समजावून सांगितली. Voltas चे ठाणे व ऐरोली येथे या कोर्सेसचे केंद्र आहे. विशेष म्हणजे एक repairing and maintenance यासोबत इतरही अनेक कोर्सेस येथे शिकवले जातात. हे सर्व कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत. 
तसेच allcargo Logistics या कंपनीच्या रिया मॅडम व  अपेक्षा मॅडम यांनी त्यांच्याकडे Logistics या क्षेत्रातील जे कोर्सेस उपलब्ध आहेत, त्याची माहिती दिली. 
हे सर्व कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत येणारे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत. या कोर्सेस साठी अट असते ती फक्त वयाची १८ वर्षे पूर्ण असावीत व शिक्षण १० वी पूर्ण असावे.
या दोन्ही कंपन्यांचे अधिकारी शाळेत आणण्यामागे ज्यांनी प्रयत्न केले ते दिगंत स्वराज फाऊंडेशनचे सीईओ माननीय राहुल तिवरेकर यांनी. कार्यक्रमाच्या उद्देश त्यांनी विद्यार्थ्याना सांगितला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी विद्यालयाचे शिक्षक मांजरेकर सर यांनी केले. श्री. निकम, राजू नायनाक यांनी हॉल व्यवस्था केली. 
काळाची गरज ओळखून त्यानुसार पावले टाकून आपला उत्कर्ष विद्यार्थ्यांनी करावा हीच प्रामाणिक इच्छा अधिराज सर व राहुल सर यांचीआहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. 
आपल्या शेजारी, ओळखीतील, नातेवाईकांपैकी असे कोणी jobless व्यक्ती मग स्त्री असो की पुरुष त्यांना हे कळू द्या. किमान अट आहे १० वी झालेले असेल व १८ ते ३५ वर्षे या वयात ही प्रशिक्षणे घेऊन जॉब करा किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करा. भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. 

टिप्पण्या

Pranita Purushottam Raul म्हणाले…
माजी विद्यार्थ्यांसाठी खरच हे फार उपयुक्त आहे.या संधीचा लाभ नक्की घेता येईल यात शंका नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

SSM दहीहंडी

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....